Advertisement

Breaking News
Loading...

“कोट्यवधींची नोकरी सोडून सायकलवर ‘आयुष्य’ शोधणारा जर्मन युवक; सोलापूरचे काँग्रेस नेते सुदीप दादा चाकोते यांची खास भेट”...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : बेंगलोर ते पुणे प्रवासादरम्यान हायवेवर घडलेली एक अनोखी भेट मनाला स्पर्शून गेली. सायकलवरच आपलं संपूर्ण घर घेऊन प्रवास करणारा जर्मनीतील युवक मॅक्सिमस (मॅक्स) मायर याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


बर्लिनजवळील स्ट्रॉसबर्ग येथील रहिवासी असलेला मॅक्स एकेकाळी युरोपमधील नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कोट्यवधींच्या पॅकेजवर कार्यरत होता. मात्र, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी त्याने सर्व काही सोडून गेल्या तीन वर्षांपासून भारतभर सायकलवर भ्रमंती सुरू केली आहे.


या अनोख्या प्रवासादरम्यान सोलापूरचे काँग्रेस नेते सुदीप दादा चाकोते यांनी त्याची भेट घेतली. धाब्यावर झालेल्या संवादात मॅक्सने साधेपणातील आनंद, स्वातंत्र्य आणि मनःशांती याबद्दल आपले विचार मांडले.


“The life you’re waiting for is already passing you by,” हे त्याचे वाक्य उपस्थितांना विचार करायला भाग पाडणारे ठरले.

या भेटीमुळे अनेकांना आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली असून, छोट्या क्षणांमध्येच खरा आनंद दडलेला असतो, हा संदेश या अनुभवातून अधोरेखित झाला.




Post a Comment

0 Comments