मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत परिसरातील सर्व धर्मीय नागरिक, मान्यवर तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नागरिकांनीही आपापल्या सूचना मांडत सण एकोप्याने व बंधुभावाने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. मंद्रूप परिसरात शांतता टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मत बैठकीत व्यक्त झाले.
बैठकीचा शेवट सर्वांच्या सहकार्याच्या आश्वासनाने करण्यात आला. आभार गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार सागर चव्हाण यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवर:
माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला, माजी सरपंच नजीर आवटे, मौलाना अब्बास रजा, ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार, बाबुलाल निगेवान, बाबु मकानदार, अली मुजावर, सिकंदर आवटे, सिकंदर मकानदार, हारून मकानदार, इसाक शिकलगार, बुडन मकानदार, महमद शेख आदी उपस्थित होते.


0 Comments