Advertisement

Breaking News
Loading...

नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ‘नाईकडा’ जमातीबाबत दाखले प्रकरणी एकत्रित निकाल...

 


नागपूर : हॅलो रिपोर्टर न्यूज : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘नाईकडा’ अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रांशी संबंधित तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी करत महत्त्वाचा निर्णय दिला. मा. न्यायमूर्ती श्रीमती एम. एस. जावळकर आणि मा. न्यायमूर्ती नंदेश बी. देशपांडे यांच्या खंडपीठासमोर ही प्रकरणे आली होती.

या प्रकरणात तारासिंग रामसिंग नाईक, स्वाती तारासिंग नाईक आणि योगेश उदयसिंग भोखन यांनी जेष्ठ विधिज्ञ् ॲड. सुशांत येरमवार यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकांमध्ये अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी आपण ‘नाईकडा’ या अनुसूचित जमातीचे असल्याचा दावा केला होता.

न्यायालयाने नमूद केले की, सर्व याचिकांमधील मुद्दे सारखे असल्याने त्यांचा एकत्रित निकाल देण्यात येत आहे. यामध्ये 14 नोव्हेंबर 2011 रोजी छाननी समितीने दिलेला आदेश, ज्यामध्ये याचिकाकर्त्यांचा ‘नाईकडा’ जमातीचा दावा नाकारण्यात आला होता, त्यावर मुख्यतः सुनावणी झाली.

प्रकरणातील नोंदींनुसार, संबंधित याचिकाकर्त्यांच्या शाळा नोंदी, कुटुंबीयांची माहिती तसेच तपासणीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे यांचा विचार करण्यात आला. 2007 मध्ये करण्यात आलेल्या सतर्कता चौकशीतही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.

या याचिकांवर अंतिम सुनावणी 17 मार्च 2026 रोजी पूर्ण झाली असून 24 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला.

या निकालामुळे ‘नाईकडा’ जमातीच्या प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या वादांवर महत्त्वाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात प्रभावी बाजू मांडून न्यायालयीन लढाई यशस्वी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुशांत येरमवार साहेब (मो. 98230 99140) यांचे व याचिकाकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.










आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments