Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात ‘ओपन लॉन’, ‘पोलीस नर्सरी’ व ‘ऑरगॅनिक मॉल’चे भव्य उद्घाटन; डॉरमेट्री हॉलचे भूमिपूजन संपन्न...

 


सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोlर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते ‘ओपन लॉन’, ‘पोलीस नर्सरी’ आणि ‘ऑरगॅनिक मॉल’चे उद्घाटन करण्यात आले. तसेच पोलीस अंमलदारांसाठी बांधण्यात येणाऱ्या डॉरमेट्री हॉलचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.


सुमारे २ एकर परिसरात विकसित करण्यात आलेल्या या ओपन लॉनमध्ये शासकीय तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खासगी कार्यक्रमांसाठी प्रशस्त व्यवस्था, रूम्स व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण करण्यात आला आहे.


या कार्यक्रमात पोलीस विभागाला महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन विभागाकडून मिळालेल्या ५ नवीन स्कॉर्पिओ जीप, १० सर्व्हेलन्स व्हॅन आणि फॉरेन्सिक वाहनांचेही लोकार्पण करण्यात आले.


कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून सुरू असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. यात बास्केटबॉल ग्राउंड, बॅडमिंटन हॉल, पोलीस भरती प्रशिक्षण मैदान, वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, ऑरगॅनिक मॉल आणि सेंद्रिय आठवडा बाजार यांचा समावेश आहे.


पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर यात्रेदरम्यान केलेल्या उत्कृष्ट गर्दी व वाहतूक व्यवस्थापनाबद्दल पोलीस अधीक्षकांचे कौतुक केले. तसेच अत्याधुनिक वाहने व साधनांचा योग्य वापर करून जनतेला अधिक चांगली सेवा देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे, आमदार अभिजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह अनेक मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी केले.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments