सोलापूर| हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दि. २० एप्रिल – शहरातील विकासकामांबाबत जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वपक्षीय नेते आणि विरोधकांना सज्जड इशारा दिला. “अपूर्ण माहितीवर वक्तव्ये करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, तथ्यांवर आधारित बोला,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि समन्वय आवश्यक असल्याचे सांगत राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सोलापूरकरांसाठी दिलासादायक घोषणा करत “कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही” असे स्पष्ट संकेत गोरे यांनी दिले. मालमत्ता कर वाढीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
विधान परिषद उमेदवारीबाबत त्यांनी सावध भूमिका घेत “पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल” असे सांगितले. त्यांच्या वक्तव्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी महापालिका सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments