Advertisement

Breaking News
Loading...

ऊळेगावात मध्यरात्री थरारक खून; 54 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या...

 


उळेगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका 54 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय विठ्ठल शिंदे (रा. शिवाजीनगर, ऊळे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

ही घटना शुक्रवारी पहाटे 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने मानेजवळ जबर वार केल्याने संजय शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक घोळवे, एएसआय बाणेवाले, सांजेकर तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी फरार आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments